You are here

Home » रेसिपी » सोया चंक्स विथ मॅगी मसाला राइस

सोया चंक्स विथ मॅगी मसाला राइस

साहित्य:  

1 कप सोया चंक्स , 2 कप बासमाति तांदुळ , 2 टोमॅटो , 1 गाजर , 1मध्यम आकाराची शिमला मिरची , 2 चमचे मॅगी मसाला मॅजिक 1 चमचा लाल मिरची पूड . ½ कप मटर चे दाणे , 1 मध्यम आकारचा कांदा (बारिक चिरलेला)

2 चमचे कोथंबिर  , 2 चमचे लिंबुचा रस , ½ चमचा अद्रक पेस्ट , ½ चमचा लसुण पेस्ट. ½ चमचा जिरे.

 

कृति: 

सोया चंक्स शिजवुन घ्यावे . 6 कप पाण्यात 2 कप तांदुळ घालुन एक दाना कच्चा रहील असा शिजवुन घ्यावा व चाळणीत कढावा . कढई मध्ये तेल गरम झाल्यावर जिरे घाला. चिरलेला कांदा गुलाबीसर झाला कि त्यात अद्रक लसुण पेस्ट घाला . त्यात गाजर , मटर , शिमला मिरची , टोमॅटो घालुन चांगले मऊ शिजु द्या . सोया चंक्स लाल मिरची घाला परतुन थोडे पाणी घाला पाणी उड्ले की त्यात शिजवलेला भात मीठ कोथंबिर लिंबाचा रस  व मॅगि मसाला मॅजिक घाला चांगले ढवळुण घ्या .मंद आचेवर झाकण ठेऊन एक वाफ येऊ द्या . गरम गरम वाढा .