You are here

Home » रेसिपी » मुर्ग मुसल्लम

मुर्ग मुसल्लम

साहित्य :

  • 1 ¼ किलो चिकनचे पिस ( तुकडे ) 
  • 4 हिरव्या मिरच्या , 4 चमचे अद्र्क लसूण पेस्ट ,1 छोटा चमचा गरम मसाला पूड, 5 छोटे चमचे मीठ , 1 छोटा चमचा हळद पूड , 1 कप दही , 2 छोटे चमचे लाल मिरची पूड , 12 लवंगा ,12 काळी मिरि , 2 तुकडे दालचिनी (2 ½ सें.मी चा तुकडा , 8 सोललेल्या मासाला वेलच्या , 16 बदाम  सोललेले ,
  • 1 छोटा चमचा जिरे , 2 छोटे चमचे धणे , 1 कप तेल , 3 कांदे (मोठे) उभे चिरलेले  , 3/4 कप पाणी , 3 टोमॅटोची प्युरि किंवा शिजवून मिक्सर मध्ये फिरवुन घ्यावे , 2 मोठे चमचे कोथिंबीर कापलेली.

 

कृति :

मिरच्या 2 चमचे अद्र्क लसूण पेस्ट याचे वाटून करुन घ्यावे , चिकनच्या तुकड्यांना काट्याने छेदावे या तुकड्यांना व पेस्ट व दहि , गरम मसाला , हळद पूड , 1 चमचा मीठ , 1 चमचा लाल मिरची पूड चांगली मिसळुन लावा व ½ तास मुरु द्या.

लवंग , मिरी , दालचिनी , वेलची , जिरे , धने , बदाम , सर्व एकत्र करुन मंद आचेवर भाजा व कुटा .

कांदा तेलात चांगला गुलाबी झाल्यानंतर वेगळा काढुन घ्या. हा कांदा व शिल्लक अद्र्क लसुण पेस्ट् याचे वाटण करा . कुकर मध्ये तेल घालुन त्यात चिकन चे तुकडे चांगले गुलाबी परतुन घ्या व बाजुला काढा . कुकर मध्ये जे तेल उरेल त्यात वरिल वाट्ण व कुट्लेला गरम मसाला सर्व परतुन घ्या त्यात चिकनचे तुकडे परतुन घ्या आणि वरुन 4 चमच्रे मीठ , टोमॅटो प्युरी , उरलेलि मिरची पूड घालुन चांगले ढवळुन घ्या. त्यात उरलेले मुरवण ¼ कप पाणी घाला. कुकर बंद करुन प्रखर आचेवर चांगले प्रेशर येउ द्या . प्रेशर आले कि आच कमी करून  5 मिनिट शिजवा .

कुकर थंड झाल्यानंतर उघडा  व  वरून थोडी कोथंबिर टाका.