You are here

Home » रेसिपी » भरली कारले

भरली कारले

साहित्य :

4 कारले , चवीनुसार मीठ , 1 छोटा चमचा धना पूड , ½ छोटा चमचा हळद , ½ छोटा चमचा जिरे ,  ½ छोटा चमचा मोहरी , 1 छोटा चमचा लाल मिरची पुड , 2 मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट , 1 चमचा चिंचेचा कोळ , ½ चमचा गुळ (किसुन) 4 चमचे तेल . 1 कप पाणी .

कृति :

कारल्या वरिल ओबड धोबड पृष्ठ भाग किसनीवर किसून घ्यावा .कारल्याच्या फोडी करुन घ्या .  त्यात मीठ , धना पूड , हळद , दाण्यांचा कुट , मिरची पूड  हे सर्व मिश्रण एकत्र करुन भरुन घ्या . कढई मध्ये तेल कड्कडित करुन जिरे मोहरिची फोडनि करा त्यात कारल्याच्या भरलेल्या फोडी घाला . त्यावर गुळ व चिंचेचा कोळ घालुन पाणी घाला मंद आचे वर शिजु द्या.