You are here

Home » रेसिपी » बटाटे - चीज सूप

बटाटे - चीज सूप

साहित्य :

7 बटाटे (ना शिजवता ) साले काढून बारिक चिरलेले

1 मध्यम आकाराचा कांदा (चिरलेला) , 1 चमचा मीठ , 1 ½  कप पाणी, 4 ½ कप दूध, 4 मोठे चमचे मैदा ,1/4 छोटा चमचा ताजी मिरी पूड , 3 कप किसलेले चीज  ,1 मोठा चमचा चिरलेली  पार्सली किंवा कोथंबीर.

 

कृति :

कुकर मध्ये चिरलेले बटाटे , कांदा ,  मीठ , पाणी घालुन प्रखर आचेवर चांगले प्रेशर येउ द्या आच कमी करा 2 ते 3 मिनिट शिजु द्या . आच बंद करुन कुकर थंड करा . हे सर्व मिश्रण रवीने / ब्लेंडरने एकजिव करुन गाळणीने गाळून घ्या . 4 चमचे मैद्यात ½ कप दूध थोडे थोडे करुन घाला. हे मैद्याचे मिश्रण  व उरलेले दूध मिरी पूड सूप मध्ये घाला . सर्व मिश्रण कुकर / कढई मध्ये दाट होई पर्यंत ढवळा वरुन चीज घाला ते विरघळे पर्यंत ढवळा .गरम गरम वाढा व वरुन पर्सली पेरा.