You are here

Home » रेसिपी » बच्चा पार्टी पकोडा

बच्चा पार्टी पकोडा

साहित्य (भरण्यासाठी)  – सॅंड्विच ब्रेड 6/8, मध्यम आकारचे उकडलेले बटाटे 5, ½ कप पनीर, 1 हिरवी मिरची, ½ लहान चमचा जिरे, ½ चमचा लाल मिरची पावडर, ½ चमचा चाट मसाला / किंवा आमचुर पावडर, ¼ चमचा गरम मसाला, 2 चमचे लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

साहित्य (वरील आवरणासाठी) – बेसन पीठ 3 किंवा 4 मोठे चमचे , ¼ चमचा जिरे, 1/4 चमचा गरम मसाला , ¼ चमचा लाल मिरची पावडर , ¼ चमचा मीठ , ¼ चमचा चाट मसाला किंवा आमचुर पावडर , ½ चमचा लिंबु रस , पाणी

कृति – ब्रेड मधुन कापुन घ्या. बटाटे आणि पनीर किसून घ्या. हिरवी मिरची बारीक कापून घ्या. किसलेल्या बटाट्यामध्ये पनीर, हिरवी मिरची, जिरे, लाल मिरची पावडर, चाट मसाला / आमचुर पावडर , गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घालुन हे मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण ब्रेड्च्या स्लाइसला चांगले लावून त्यावर दुसरी ब्रेड ठेवुन दोन्ही स्लाइस चांगले दाबुन घ्या. सर्व ब्रेड तयार करुन बाजुला ठेवा .

बेसन पिठामध्ये जिरे, गरम मसाला, लाल मिरची पावडर, मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस, एकत्र करुन त्यात अगदी सावकाश पाणी घालुन पिठ भिजवून घ्या. तेल चांगले कडकडीत तापवून आच कमी करा आणि भरलेली ब्रेड बेसनाच्या मिश्रणात बुडवून हळुच तेलात सोडा. ब्रेड्वर झार्याने तेल उडवत दोन्ही बाजूने तळून घ्या. सॉस किंवा चटणी सोबत मुलांना द्या .

टिप – पनीर ऐवजी फ्लॉवर / मटार / गाजर  देखील वापरु शकता. मात्र प्रमाण कमीच ठेवा नाहीतर या भाज्या एकत्र एकजीव होणार नाहीत आणी ब्रेडला चिकटणार नाही. लिंबू रस तुमच्या आवडी नुसार जास्त, कमी प्रमाणात घालू शकता. बेसन पीठ भिजवताना फार पातळ / फार घट्ट करु नये .