You are here

Home » रेसिपी » झटपट दह्यातील मिर्ची

झटपट दह्यातील मिर्ची

साहित्य: 

  • 1 वाटी दही 
  • 100 ग्राम हिरवी मिर्ची
  • 2 चमचे शेंगादाण्याचा कूट
  • तळ्ण्यासाठी तेल
  • चवी पुरते मीठ .

कृति:  

मिर्चीचे चे तुकडे करुन घ्या. तव्यावर थोडे तेल घालुन त्यात मिर्चीचे तुकडे चांगले परतुन घ्या.

चट्कन त्यावर मीठ घाला . कालथीने मिर्ची  परतत रहा. त्यावर लगेचच दही घाला. दही शिजू द्या . कालथीने ढवळत रहा. त्यात शेंगदाण्यांचा कूट घालून निरंतर धवळत रहा . त्यातील सर्व दही आटले की तुमची दह्यातील मिर्ची तयार. काय आहेना झटपट?

टिप: दही जरा आंबट असेल तर चव अधिक चांगली होते. यासाठी मिर्ची जाड सालीची घ्या जी आकारानेन तिखट मिर्ची पेक्षा मोठी असते व रंगाने फिक्की असते.