You are here

Home » रंगमंच » यारी दोस्ती

यारी दोस्ती

मराठी चित्रपटसृष्टी आता जसजशी बहरत चालली तसे यात नवनवीन प्रयोगही होताना दिसत आहेत. नव्याकोऱ्या चेहऱ्यांना घेऊन चित्रपट करण्याचा नवा ट्रेंड आता रुजू होताना दिसत आहे. असाच एक किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित ‘यारी दोस्ती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
बिपीन शाह मोशन पिक्चर्स प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित ‘यारी दोस्ती’ चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येईल. तर ‘माझी शाळा’ या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे मुख्य भूमिकेत दिसेल. आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. यांच्यासोबतच ‘उर्फी’ फेम मिताली मयेकर एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळेल. मैत्रीची नवी परिभाषा सांगणाऱ्या या चित्रपटात संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्याही भूमिका पहायला मिळतील. शांतनु अनंत तांबे लिखित, दिग्दर्शित ‘यारी दोस्ती’ चित्रपट १६ सप्टेबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Year of release: 
2016