You are here

Home » रंगमंच » बघतोस काय मुजरा कर

बघतोस काय मुजरा कर

दिग्दर्शक, लेखर हेमंत ढोमे याने आपल्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली आहे. महाराष्ट्राचं वैभव आणि महाराजांचा स्पर्शाने पावन झालेल्या गड किल्यांवर आधारित हा सिनेमा आहे. छत्रपती महाराजांनी स्वराज्यासाठी या गडकिल्ल्यांची निर्मिती केली. मात्र आज हे गडकिल्ले वेगळीच उपासमार सहन करत आहेत.
आज गडकिल्ल्यांची दुरावस्था आपण पाहतोय. गडकिल्यांवर दारूच्या पार्ट्या होतात. गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्या जातात. मात्र इंग्रजांनी त्यांचा इतिहास जतन करून ठेवलाय. त्यांच्या इतिहासाच्या खुणा आजही आपल्याला तिथे स्पष्ट दिसतात. असं चित्र आपल्या भारतात, महाराष्ट्रात कधी पाहायला मिळेल असा सवाल या टिझरमध्ये विचारण्यात आला आहे.
या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमेने केलं असून यामध्ये प्रमुख कलाकार जितेंद्र जोशी आहे. या सिनेमातील गाणी क्षितीज पटवर्धनने लिहिली असून अमितराजने त्याला संगीत दिलं आहे. पोस्टर गर्ल सारखा हटके विषय घेऊन आलेल्या हेमतं ढोमेकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. आता हेमंत घेऊन येत असलेल्या बघतोस काय मुजरा कर सिनेमा साताऱ्यामध्ये चित्रित करण्यात आला आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी मुख्य भूमिकेत आहे.

Year of release: 
2016