You are here

Home » रंगमंच » फोटोकॉपी

फोटोकॉपी

फोटोकॉपी हा एक मराठी, विनोदी  प्रेमकथा असलेला चित्रपट असून जाहिरात निर्माते , राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक आणि प्रथमच दिग्दर्शनात पदार्पण करीत असलेले विजय मौर्य दिग्दर्शित करत असून गायिका नेहा राजपाल यांची निर्मिती आहे. चित्रपटाचे कथालेखक आकाश राजपाल आणि ओमकार मंगेश दत्त आहेत. चित्रपटाची कथा प्रेमत्रिकोणावर आधारित असून या चित्रपटात चेतन चिटणीस आणि  पर्ण पेठे यांची मुख्य भूमिका आहे. पर्ण या चित्रपटात दुहेरी भूमिकेत असून अशा जुळ्या बहिणींची भूमिका करत आहे ज्या एकाच मुलाच्या ( चेतन चिटणीस ) प्रेमात पडतात.

 

Year of release: 
2016