You are here

Home » रंगमंच » न्यूड

न्यूड

रवि हा केवळ फक्त एक यशस्वी दिग्दर्शकच नाही तर सिनेमाचा विषय, त्याची मांडणी, कलाकारांची निवड आणि अगदी ते सिनेमाची जाहीरात, पब्लिसिटी अशा सर्वच विभागांमध्ये रवि जाधव यांचा हातखंडा दिसून येतो. अॅडमॅन ते दिग्दर्शक असा प्रवास असणाऱ्या रविला लोकांमध्ये स्वतःच्या प्रॉडक्टविषयी उत्सुकता निर्माण करणे नेहमीच जमते. आता हेच पहा की काही दिवसांपूर्वीच रविने 'बँजो' या त्याच्या नव्या आणि पहिल्या हिंदी सिनेमाची घोषणा केली.

रवीने आत अजून एक सुखद धक्का चाहत्यांना दिला आहे. ही बातमी त्याच्या नव्या मराठी सिनेमाची आहे. 'न्यूड' या रवि जाधव दिग्दर्शित आणि मेघना जाधव निर्मित मराठी सिनेमाचे पहिले पोस्टर रविने आज सोशल साईटवर प्रदर्शित केले. या सिनेमावर गेले कित्येक महिने रवी काम करत होता, असेही त्याने सांगितले.

सिनेमाचे पोस्टर आणि त्याचे नाव पाहीले तर रवि यावेळी काहीतरी ऑफबीट घेऊन येणारे हे जाणवते. पण, सध्या तरी या पोस्टरशिवाय रवि किंवा त्याच्या टीमने कोणतीही माहिती प्रसिद्ध केली नाही. नटरंग, बालगंधर्व, मित्र, बालक पालक यांसारख्या सिनेमातूनं रविने नेहमीच वेगवेगळे आणि संवेदनशील विषय हाताळले आहेत. त्यामुळे आता न्यूड सिनेमा कसा काय वेगळा ठरतो तेच पहायचे आहे. 

Year of release: 
2016