You are here

Home » महान्यूज » मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण

मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण

औरंगाबाद : मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यात आली आहे. गायकवाड हे शहरातील सुभेदारी गेस्ट हाऊसवर आपल्या पत्नीसोबत आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण झाली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
रत्नाकर गायकवाड यांनी आंबेडकर भवन पाडण्याचा अहवाल दिला असा आरोप भारिप बहुजन महासंघाने केला आहे. त्याच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाकडून गायकवाड यांना सुभेदारी गेस्ट हाऊस येथे घेराव घालण्यात येणार होते. भारिपचे माजी नगरसेवक व जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ हे कार्यकर्त्यांबरोबर गेस्ट हाऊसजवळ आले. त्यांनी गायकवाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत अचानक त्यांना चपलेने मारहाण करण्यास सुरूवात केली. मारहाण करणाऱ्यांमध्ये महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. या प्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी ४ पुरूष व २ महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.गायकवाड यांना घेराव घालणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे आधीच तेथे पोलीस उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक दिपक आवटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.