You are here

Home » महान्यूज » मुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : महापालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहतांनी स्थायी समितीसमोर सादर केला...जकातबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे...गेल्या मुंबईकरांना उत्तमोत्तम सुविधा देण्यास प्रशासन बांधिल असेल, असं पालिका आयुक्त अजय मेहतांनी सांगितलं....विषेश म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प हा 11,91 1 कोटींनी कमी आहे...मुंबई पालिकेच्या निवडणुकीदरम्यान  शिवसेनेनं दिलेल्या आश्वासनाचा सेनेलाच विसर पडलाय असं दिसतंय...कारण 500 चौरस फुटावरील घरांवरचा मालमत्ता कर रद्द करण्याबद्दल कोणतीही ठोस तरतूद नाही..... एक नजर टाकूया काही ठळक तरदूतींवर.....

यंदाचा अर्थसंकल्प 11911 कोटींनी कमी

मुंबईत वाहनतळांची संख्या तीन पटीनं वाढवणार

रस्तेदुरुस्तीसाठी 1,095 कोटी

गोरेगाव – मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटींची तरतूद

कोस्टल रोडसाठी 1 हजार कोटींची तरतूद

राणीबागेच्या विकासासाठी 50 कोटींची तरतूद                    

अग्निशमन दलाच्या आधुनिकीकरणासाठी 164 कोटींची तरतूद                       

बाजार मंडई खात्याकरिता 75 कोटींची तरतूद                    

समुद्र किनारे सुभोभीकरणासाठी 15 कोटींची तरतूद

आपत्कालीन कक्षासाठी 11.75 कोटींची तरतूद

जलवितरण सुधारणेसाठी 27.81 कोटींची तरतूद

चेंबूर ते परेल बोगद्यासाठी 35 कोटींची तरतूद

चेंबूर ते ट्राँम्बे बोगद्यासाठी 25 कोटींची तरतूद

भांडूप संकुल सौर ऊर्जाप्रकल्पासाठी 8.22  कोटींची तरतूद