You are here

Home » महान्यूज » ईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ

ईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ

ईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ

नाशिक : रेव्ह पार्टीमुळं नाशिकजवळचं इगतपुरी प्रकाशझोतात आलंय. बरं ही काही साधीसुधी रेव्ह पार्टी नव्हती. तर यामध्ये सहभागी असलेल्यांची नावं पाहिलात तर तुम्हाला निश्चितपणे धक्का बसेल. अटक केलेले तरुण हे उच्चभ्रू म्हणजे आय.ए.एस. आणि आय.पी.एस. कुटुंबातले असल्यानं पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत

अर्धनग्न अवस्थेत नाचणा-या बारबाला, त्यांच्यावर पैसे उधळणारे मद्यधुंद अवस्थेतले युवक आणि डिजेचा कर्णकर्कश आवाज. हे वर्णन काही कुठल्या डान्सबारचं नाही. हा धुमाकूळ सुरू होता ईगतपुरीत असलेल्या मिस्टीक व्हॅलीतल्या बंगला नंबर 11 मध्ये. काहींनी ईगतपुरी पोलिसांना खबर दिल्यानंतर मिस्टीक व्हॅलीवर छापा टाकण्यात आला. पोलिसांना पाहताच बारबाला, मद्यधुंद अवस्थेतल्या मुलांची पळापळ झाली.

पण या पार्टीमधली खरी गोष्ट तर पुढेच आहे. ही काही साधीसुधी पार्टी नव्हती तर यामध्ये सहभागी झाले होते ते आएएएस, आयपीएस अधिका-यांची मुलं. असं सांगितलं जातंय की नागपुरच्या डिसीपींचा भाऊ, औरंगाबादच्या उपजिल्हाधिका-या मुलगा, ठाण्यातल्या पीडब्ल्यूडीतल्या अधिका-यांचा मुलगा, नंदुरबारच्या पोलीस अधिका-याचा मुलगा या छाप्यात सापडले. बिभत्स वर्तणूक केल्याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी पृथ्वीराज युवराज पवार, सुमीत श्रीराम देवरे, कौस्तुभ विश्वास जाधव, सुशांत जीभाऊ गांगुर्डे, ललित सुनील पाटील या 5 युवकांसह 6 बारबालांवर गुन्हे दाखल केले. छाप्यावेळी ते नशेत होते.

5 युवक, 6 बारबाला आणि 2 डिजेचालक अशा १३ लोकांवर प्राथमिक कारवाई करुन नाशिक ग्रामीण पोलीसांनी सर्वांना सोडून दिलं. पण या कारवाईचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि बिंग फुटलं...