You are here

Home » महाराष्ट्रनामा » महान्यूज

महान्यूज

मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाडांना मारहाण

औरंगाबाद : मुंबईतील आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यात आली आहे. गायकवाड हे शहरातील सुभेदारी गेस्ट हाऊसवर आपल्या पत्नीसोबत आले होते. त्यावेळी त्यांना मारहाण झाली. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

Read more

2019 पर्यंत ग्रामीण भागात प्रत्येकाला घर – मुख्यमंत्री

मुंबई: मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राज्यात ग्रामीण भागात मागील दोन वर्षात 3 लाख घरकुलांचे काम हाती घेण्यात आले आहे, त्यापैकी सव्वा लाख घरांचे काम पूर्ण झाले आहे. राज्य शासनाने दारिद्र्य रेषेसाठीच्या निकषांमध्ये बदल केल्याने पात्र गरीबांना याचा लाभ मिळत असून 2019 पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागात एकही नागरिक बेघर नसेल, असे ते म्हणाले. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ही डिजीटल करण्याचे धोरण असून या वर्षाखेर राज्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे ही इंटरनेटने जोडलेली असतील.

Read more

महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून अप्पासाहेब धर्माधिकारी, कैलाश खेर, संजीव कपूर आणि भावना सोमय्या या मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.  राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्‍या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

Read more

ट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर

नागपूर: थ्री इडियट्समध्ये दाखवलेला प्रसूतीचा कठीण प्रसंग सर्वांच्याच अंगावर काटा आणणारा असा होता. असाच प्रसंग नागपूरमध्ये घडलाय... वर्धा ते नागपूरदरम्यान एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि एकच गोंधळ उडाला. नेमकं काय करावं हे तिच्यासोबत असलेल्या नव-यालाही कळायला मार्ग नव्हता. त्यानं गाडीची चेन खेचली आणि कोणी डॉक्टर मिळतोय का यासाठी शोधाशोध सुरू केली...आणि एखाद्या देवदूताप्रमाणे एक डॉक्टर त्यांच्या मदतीला धावून आला..

Read more

64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा

नवी दिल्ली : 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा शुक्रवारी झाली असून सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘कासव’ या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली तर सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘दशक्रिया’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला विविध श्रेणीमध्ये अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Read more

मुंबई महापालिकेचा २५ हजार १४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर

मुंबई : महापालिकेचा 2017-18 या वर्षाचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अजोय मेहतांनी स्थायी समितीसमोर सादर केला...जकातबंदीनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे...गेल्या मुंबईकरांना उत्तमोत्तम सुविधा देण्यास प्रशासन बांधिल असेल, असं पालिका आयुक्त अजय मेहतांनी सांगितलं....विषेश म्हणजे यंदाचा अर्थसंकल्प हा 11,91 1 कोटींनी कमी आहे...मुंबई पालिकेच्या निवडणुकीदरम्यान  शिवसेनेनं दिलेल्या आश्वासनाचा सेनेलाच विसर पडलाय असं दिसतंय...कारण 500 चौरस फुटावरील घरांवरचा मालमत्ता कर रद्द करण्याबद्दल कोणतीही ठोस तरतूद नाही..... एक नजर टाकूया काही ठळक तरदूतींवर.....

Read more

ईगतपुरीत रेव्ह पार्टीचा धुमाकूळ

नाशिक : रेव्ह पार्टीमुळं नाशिकजवळचं इगतपुरी प्रकाशझोतात आलंय. बरं ही काही साधीसुधी रेव्ह पार्टी नव्हती. तर यामध्ये सहभागी असलेल्यांची नावं पाहिलात तर तुम्हाला निश्चितपणे धक्का बसेल. अटक केलेले तरुण हे उच्चभ्रू म्हणजे आय.ए.एस. आणि आय.पी.एस. कुटुंबातले असल्यानं पोलिसांनी केलेल्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित होत आहेत

Read more

उद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नवा बंगला वांद्रे येथे तयार होतोय. सहा मजली इमारतीचं बांधकाम सध्या वेगानं सुरू आहे. पाच महिन्यांपूर्वी त्यांना इमारतीच्या बांधकामाची परवानगी मिळाली होती. इमारतीसाठी जागा घेताना उद्धव ठाकरेंना तब्बल अकरा कोटींचा खर्च आला.

'मातोश्री' बंगल्यापासून जवळ, कलानगरमध्येच आलिशान सहा मजली इमारत उभी राहतेय. उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कलानगरमधील एक प्लॉट11.60 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यातील 10 हजार चौरस फुटांहून अधिक जागेवर ते आपलं नवं घर बांधताहेत.या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत.

Read more

अर्थसंकल्पातून कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न- डॉ.सुभाष निकम

नाशिक : राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे कृषी क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न करताना पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे रोजगार निर्मितीवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांनी केले.

Read more

विकासकामात अडथळा येऊ नये यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ- पंकजा मुंडे

विधानसभा प्रश्नोत्तरे :

मुंबई : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांची कामे करताना जिल्हा परिषदेचे ना- हरकत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. मात्र, विकासकामात अडथळा येत असेल तर त्यासंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.

लोणी भापकर ग्रामपंचायतीच्या कामामध्ये झालेल्या गैरव्यवहारासंदर्भात सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना श्रीमती मुंडे बोलत होत्या.

Read more

Pages