You are here

Home » भटकंती » सिंधुदुर्ग जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेऊया...

विजयदुर्ग

विजयाचे प्रतिक असलेला हा किल्ला प्रचंड दगडी भिंतींनी वेढलेला असून आतील भव्य बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. श्रीरामेश्वराचे मंदिर येथील प्रमुख आकर्षण आहे.

आंबोली

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे थंड हवेचे ठिकाण वेंगुर्ला व सावंतवाडीपासून जवळच आहे. येथील हिरवीगार वनश्री पर्यटकांना आकर्षित करते.

मालवण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे केंद्र असलेला सिंधुदुर्ग किल्ला तसेच पद्मगड आणि सर्जेकोट या किल्ल्यांसाठी आणि इतिहासकालिन व्यापाराचे केंद्र म्हणून मालवण सुप्रसिद्ध आहे.

तारकर्ली

आंतरराष्ट्रीय हेब्रीडीयन स्पीरीट या प्रवासी जहाजाचा नियमित थांबा असलेले तारकर्ली हे ठिकाण मालवण पासून अंदाजे ८ कि.मी. अंतरावर आहे. येथील शांत समुद्र किनारा व विस्तीर्ण खाडी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

शिरोडा

मराठी साहित्याचे मानबिंदू श्री.वि.स.खांडेकरांचे १९२० ते १९३८ पर्यंत येथे वास्तव्य होते. महात्मा गांधींच्या आदेशाने येथे मिठाचा मोठा सत्याग्रह झाला होता.

कुणकेश्वर

यादवांनी बांधलेले ११व्या शतकातील हे शिवमंदिर समुद्र किनारी वसले आहे. अतिशय सुबकरित्या घडविलेले हे मंदिर भाविकांमध्ये लोकप्रिय आहे.

मिठबाव

कुणकेश्वर मंदिरापासून फक्त १२ किमी अंतरावर वसलेले मिठबाव हे गाव येथील सलग ६ किमी लांबीच्या रुपेरी सागर किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.

मोचेमाड

वेंगुर्ल्याहून रेडी येथे जाताना हे प्रेक्षणीय ठिकाण वाटेत लागते. हिरवीगार निसर्ग संपदा, निळा समुद्र व प्रचंड खडक ही येथील आकर्षणे आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला

जलदुर्ग म्हणून प्रसिद्ध असलेला हा किल्ला १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी आरमाराचे केंद्र म्हणून बांधला. मालवण शहरापासून समुद्रामध्ये अंदाजे ३ किमी आतमध्ये हा किल्ला वसला आहे.

सावंतवाडी

लाकडी खेळणी व गंजिफा पत्त्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर वसलेले आहे. कोकणचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले आंबोली गिरीस्थान येथून जवळच आहे.

धामापूर तळे

मालवणमध्ये असलेले हे ऐतिहासकि तळे अंदाजे ५ एकरावर वसले आहे. सागरी खेळांसाठी हे एक उत्तम स्थान आहे.

पिंगुळी

अतिशय उत्कृष्ट रंगसगतीद्वारे पौराणिक कथांचे चित्रीकरण येथे पहावयास मिळते.

Sindhudurg district
Sindhudurg district
Sindhudurg district
Sindhudurg district