You are here

Home » भटकंती » सांगली जिल्हा

सांगली जिल्हा

सांगली जिल्हा

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांत विविध स्वरूपाची पर्यटन स्थळे आहेत. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती जाणून घेऊया.

 

औदुंबर

औदुंबर हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून श्री दत्तात्रयाचे स्थान म्हणून ओळखले जाते. हे ठिकाण कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे.

बत्तीस शिराळे

नागपंचमीला भरणाऱ्या उत्सवामुळे बत्तीस शिराळे गाव जगप्रसिद्ध आहे. या दिवशी शेकडो नाग व सापांना पकडून त्यांची पूजा केली जाते. नंतर त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी साडले जाते.

नरसोबाची वाडी

कृष्णा व पंचगंगेच्या संगमावर वसलेले हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे श्रीदत्तगुरुंच्या पवित्र पादुका आहेत.

चांदोली नॅशनल पार्क

सांगली जिल्ह्यातील चांदोली नॅशनल पार्क हे एकमेव राष्ट्रीय अभयारण्य आहे. सदर स्थळाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने चांदोली राष्ट्रीय पार्क व कोयना वन्यजीवन अभयारण्य मिळून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास व्याघ्र राखीव प्रकल्प म्हणून २१ मे २००७ मध्ये घोषित केलेले आहे. सद्यस्थितीत चांदोली नॅशनल पार्क येथे ९ वाघ व ६६ बिबटे आहेत.

 

प्रचितगड

संगमेश्वर तालुक्याच्या शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. या गडावर जाण्यासाठी सह्याद्री पर्वतामधून वाट काढत जावे लागते. प्रचितगडावर चार तोफा व पडिक वास्तू असून येथील कातळाच्या तळघरात असणारे थंडगार पाणी म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे.

मिरज दर्गा

मिरज शहराच्या लौकिकात व सौंदर्यात भर टाकणार्याअ ज्या अनेक वास्तू आहेत. त्यामध्ये ख्वाजा शमशोद्दिन मिरासाहेबाचा दर्गा हे मिरजेचे खास आकर्षण आहे. हजारो हिंदू-मुस्लीम भक्तांचे हे श्रध्दास्थान आहे.

श्री गणपती मंदिर

सांगली शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे ऐतिहासिक आकर्षण आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै.आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर इ.स. १८४३ साली बांधले. गणपती हे सांगली संस्थानचे आराध्य दैवत असून श्रध्दास्थान आहे.

Sangli district