You are here

Home » इंफोटेक » जिओ डी टी एच लवकरच बाजारात

जिओ डी टी एच लवकरच बाजारात

अनलिमिटेड कॉल, 4 जी डाटासारख्या एकासरस एक सुविधा मोफत देत तुमच्या मोबाईलवर राज्य गाजवल्यानंतर, रिलायन्स जिओ आता तुमच्या घरातील टीव्ही सेटवर अधिराज्य गाजवण्यास सुसज्ज आहे. पुढील महिन्यापासून जिओ फायबर ऑप्टिकवर आधारित जिओ गॅगा फायबर ही ब्रॉडबँड सेवा आणि सोबतच जिओ डीटीएच सेवाही सुरू करत आहे. 

सध्या बाजारात टाटा स्काय, डिश टीव्ही, एअरटेल व व्हिडिओकॉन या कंपन्या आधीच मैदानात आहेत. तर मग जिओ यामध्ये वेगळे काय करणार असे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.  तर जिओ नेमकं काय वेगळं करणार, ते वाचा....

  • जिओ पूर्णपणे वेगळ्या तंत्रज्ञानावर आधारित सेवा आहे. ही सेवा इतर ब्रँडप्रमाणे सॅटेलाईट वर आधारित नसून, हाय स्पीड फायबर ऑप्टिक नेटवर वर चालते. 
  • सध्या आपल्याला डीटीएच रिचार्ज करण्यासाठी सामान्यपणे  किमान 300-350 रु. मोजावे लागतात, पण जिओ ही सेवा 180 ते 200 रुपये प्रती महिना या दरात उपलब्ध करून देणार आहे.  
  • जिओचा सेट टॉप बॉक्स अवघ्या 1800 रुपयात बाजारात येणार आहे आणि 'वेलकम ऑफर' म्हणून 90 ते 180 दिवस सर्व चॅनल मोफत दिसणार आहेत.   
  • जिओचा सेट टॉप बॉक्स अँड्रॉईड लॉलीपॉपवर चालेल, म्हणजेच तुमचा नेहमीचा टीव्ही आता स्मार्ट टीव्ही मध्ये रूपांतरित होणार आहे.  
  • या सेट टॉप बॉक्समध्ये 5 जीबीची इंटर्नल मेमरी असून यात तुम्ही मन रमवण्यासाठी गेम्स खेळू शकता तसेच व्हिडिओ कॉलिंगसाठी स्काईप सारखे अ‍ॅप डाऊनलोड करू शकता   
  • 50 एच डी चॅनल कोणत्याही अतिरिक्त चार्जशिवाय उपलब्ध होतील.  
  • ही सेवा सॅटेलाईट सिग्नलवर अवलंबून नसल्याने पावसाळ्यातही टीव्ही विना अडथळा पाहता येईल  
  • आपले आवडते कार्यक्रम व चित्रपट रेकॉर्ड करता येतील. 

जिओची ही अफलातून सेवा मे महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.