You are here

Home » आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

महाप्लस हे महाराष्ट्राबद्दल प्लस म्हणजे अधिकाधिक माहिती देणारे एक संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी बातमीच्या स्वरुपात दिल्या जातील. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या क्षेत्रातल्या घडामोडींचा सांगोपांग आढावा घेणे हा ‘महाप्लस’चा उद्देश आहे.

तरुणांसाठी करिअर आणि मनोरंजन, महिलांसाठी रेसिपी, कुटुंबासाठी भटकंती आणि फिटनेस असे घरातल्या प्रत्येकासाठी या संकेतस्थळावर वेगवेगळे विभाग आहेत. चर्चेसाठी या संकेतस्थळावर महाचावडी आहे.

करिअर हा या वेबसाईटचा महत्वाचा भाग आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना योग्य नोकरी मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे, सरकारी-खासगी या दोन्ही क्षेत्रातल्या नोकरीच्या संधींची माहिती देणे हा ‘महाप्लस’चा प्रयत्न आहे. योग्यता धारण करणारे अनेक तरुण नोकरीच्या शोधात असतात तर शासनाचे विभाग, खासगी कंपन्या योग्य टॅलेन्टच्या शोधात असतात. ‘महाप्लस’या दोन्हीमधला दुवा आहे.

महासंस्कृती, महामंथन आणि महारत्न हे महाराष्ट्राविषयी इत्यंभूत माहिती देणारे विभाग आहेत. एकूण काय तर महाराष्ट्राविषयी सर्व काही म्हणजे महाप्लस!